25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रशंका असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास अडचण काय?

शंका असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास अडचण काय?

पवार यांचा सवाल, मारकडवाडी बनले ईव्हीएमविरोधी लढ्याचे केंद्र

अकलूज : संजय बडे
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमबद्दल लोकांच्या शंका असतील तर त्यांच्या शंकेचे निरसन होणे आवश्यक आहे. ईव्हीएमबद्दल शंका आली, तेव्हा मारकडवाडीतील लोकांनी गाव पातळीवर ठराव करून त्यांचे मतदान कोठे गेले, यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे ठरवले. त्यावेळी प्रशासनाने गावात जमावबंदी लागू करून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करणे व त्यांचा गावपातळीवर मतदान घेण्याचा निर्णय हाणून पाडणे कोणत्या कायद्यात बसते, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. या गोष्टीत कोणीही राजकारण आणू नये, जनतेची भूमिका काय, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले.

मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आज ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. उत्तम जानकर यांच्यासह नेते, कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते. मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आज ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. उत्तम जानकर यांच्यासह नेते, कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते. राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकडवाडी हे गाव ईव्हीएमविरोधी लढ्याचे केंद्र बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी मारकरवाडी गावाला भेट दिली. यावेळी गावातील अनेक विद्यार्थी, महिला, नागरिकांनी आम्ही केलेले मतदान गेले कुठे, असा सवाल उपस्थित करीत ईव्हीएम मशीनवर शंका घेतली आणि जोपर्यंत याचा तपास लागत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका गावक-यांनी घेतली. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा, अशी गावक-यांच्या वतीने शरद पवार यांना विनंती करत ईव्हीएम हटवा, देश वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या.

देशभर मारकडवाडीची चर्चा आहे. सर्व देशातील नागरिक तुमचे अभिनंदन करीत आहेत. त्याचा मला अभिमान आहे. मी केंद्र सरकार राज्य सरकार व निवडणूक आयोग यांच्याकडे मारकडवाडी ग्रामस्थांच्या व्यथा मांडणार आहे. पार्लमेंटमध्येही मी मारकडवाडीचा विषय गांभीर्याने मांडणार आहे. बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक झाल्याशिवाय आमदार उत्तमराव जानकर गप्प बसणार नाहीत. आम्ही सर्व मारकडवाडीच्या जनतेच्या बरोबर आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मारकडवाडीत जाऊन लोकांच्या भावना जाणून घ्याव्यात अशी मीसुद्धा त्यांना विनंती करणार असल्याचे पवार म्हणाले. यावेळी खा. धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर यांचीही भाषणे झाली.

स्वाभिमानी महाराष्ट्र
विकला जाणार नाही : पाटील
लाखाच्या मताधिक्याने निवडून येणारा उमेदवार हजाराच्या मताने कसा निवडून आला हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे . याबाबत उठाव करणारे भारतातील एकमेव गाव म्हणजे मारकडवाडी आहे. हे गाव स्वत:च्या खात्रीसाठी मतदान घेत होते. प्रशासनाने कोणत्या कायद्याने त्यांना अडवले. लाडक्या बहिणींच्या माध्यमातून पैसे वाटले म्हणून स्वाभिमानी महाराष्ट्र विकला जाणार नाही येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपर वरच घ्याव्यात हे जनता म्हणत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR