16.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeलातूर‘शक्तिपीठा’चा अट्टाहास का ?

‘शक्तिपीठा’चा अट्टाहास का ?

लातूर : विनोद उगीले
शक्तिपीठ महामार्ग पत्रादेवी-बांदा ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ते दिगरज जि. वर्धा असा ८०५ किलोमीटरचा आहे. यासाठी ८६ हजार ५०० कोटी रुपये खर्ची लावले जात आहेत. या महामार्गाचे लातूर जिल्ह्यातील अंतर ४१ किलोतीटर एवढे असून या महामार्गात मराठवाड्यातील सर्वात सुपीक व लातूर जिल्ह्याची शान असलेल्या मांजरा पट्यातील जमीन जात आहे. तशी अधिचुचना ही जारी करण्यात आली  आहे. या महामार्गाला जवळपास सर्वच जिल्ह्यातून विरोध होत असून याला लातूर जिल्ह्यातील बाधित शेतक-यांचा ही तीव्र विरोध आहे.  बाधित शेतक-यांचा विरोध असताना या महामर्गासाठी शासना अट्टाहास कायम आहे. लातूर तहसिल समोर या महार्गावरील बाधित शेतक-यांनी धरणे आंदोलन करून हार महार्माग रद्द करावा, मांजरा पट्टा वाचवावा अशी मागणी करीत तहसिलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्याना तसे निवेदन ही दिले आहे.
शक्तिपीठ हा महामार्ग १२ जिल्ह्यांतील ३७ तालुक्यांतील ३६८ गावांतून जाणार असून, यात २७ हजार ५०० एकर जमीन जाणार आहे. या महामार्गाला सर्वच जिल्ह्यातून शेतक-यांचा तीव्र विरोध आहे.  आठ दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्याना निवेदन देऊन हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली असताना प्रत्येक जिल्ह्यात भूसंपादनाची अधिसूचना निघत आहे.लातूर जिल्ह्यात ही ७ जून रोजी अधिसूचना काढली आहे. त्यामुळे शक्तिपीठच्या विरोधात मंगळवारी दि. १८ रोजी लातूर तहसिलसमोर जिल्ह्यातील बाधित शेतक-याच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.
रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम टप्प्यात असताना या महामार्गाच्या जवळपासच शासनाने शक्तिपीठ महामार्ग मंजूर केला आहे.  राज्यातील १२ हजार ५८९ गट नंबरमधरून हा महामार्ग जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग रिअल इस्टेट कायद्यांतर्गत ही जमीन संपादित  केली जाणार आहे. मागणी  नसतानाही शासनाने हा महामार्ग मंजूर केला आहे. सध्या रत्नागिरी- नागपूर महामार्ग या तीर्थक्षेत्राजवळूनच जातो. यात हजारो एकर सुपीक जमीन जाणार असून, शेतकरी भूमीहीन होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR