23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांना सोडणे ही माझी मोठी चूक

शरद पवारांना सोडणे ही माझी मोठी चूक

जाहीर सभेत अजितदादांची कबुली

गडचिरोली : प्रतिनिधी
अजित पवारांनी काका शरद पवारांचा हात सोडला अन् ते महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंबात फूट पडली. काहींनी अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. तर काहींनी कडाडून विरोध केला. पण या निर्णयाबद्दल स्वत: अजित पवारांना काय वाटतं? महायुतीत सहभागी झाल्यानंतर वर्षभराने अजित पवार यावर बोलते झाले. अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात होती. गडचिरोलीतील या जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी यावर भाष्य केले आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम-हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यावर बोलताना अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं, तेवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही.

याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. ती माझी चूक मी मान्य केली आहे, असे अजित पवार म्हणाले.
धर्मराव बाबांच्या मुलीने दुस-या पक्षात जाण्याचे ठरवले आहे, अस बाबाने सांगितले. ती आता बाबाच्या विरोधात उभी राहील म्हणतेय, पण हे शोभतं का? तुम्ही अशा गोष्टीत लक्ष देऊ नका. मी तिला सांगू इच्छितो की, वस्ताद सगळे डाव शिकवतो. पण एक डाव स्वत:साठी राखून ठेवतो. तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये. म्हणून मी सांगतो, तुम्ही बाबाच्या मागे उभे राहा. त्यांना निवडून आणा, असे अजित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR