29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरशहराचा पूर्वभाग महाविकास आघाडीमय

शहराचा पूर्वभाग महाविकास आघाडीमय

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी जनसंपर्क अभियाना अंतर्गत दि. ११ नोव्हेंबर रोजी सांयकाळी शहरातील २, ३, ४ व ७ या  भव्य प्रभागांतून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला या चारही प्रभागांतील मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. पुरुष महिला युवती मोठया प्रमाणात या रॅलीत सहभागी झाले होते. युवकांची संख्या लक्षणिकय होती.
प्रभाग क्रमांक ४ मधील बिलाल मस्जिद चौकात माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथून प्रचार रॅलीस सुरुवात तेथून इस्लामपूरा, मदनीचौक, सुफिया मस्जिद, तथागत चौक, हेलन चौक. प्रभाग ३ मधील तुळजाभवानीनगरपासून रॅलीचा प्रारंभ झाला. जयभीमनगर, इंदिरानगर, राजीवनगर, विवेकानंद चौक, प्रभाग क्रमांक ७ मधील विवेकानंद चौकापासून जिजामाता शाळा, दसरा पार्क, सिद्धार्थ सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मिरकले कॉर्नर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चौक ते मचाले, प्रभाग क्रमांक २ मधील मचालेपासून ते कृपासदन चौक, अराफत चौक, पू. अहिल्यादेवी होळकर चौक, संविधान चौक चौकातू प्रचार रॅली एक मिनार चौक  चौकात पोचल्यानंतर तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
प्रचार रॅली मार्गावर असंख्य घरांच्या छतावरुन रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, हातात फलक, झेडे घेऊन मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक सहभागी झाले होते. लातूर शहराचा पुर्वभाग हा लातूरचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सोमवारी सायंकाळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या निघालेल्या प्रचार रॅलीने शहराचा पुर्वभाग महाविकास आघाडीमय झाला. युवकांचा सहभाग लक्षणिय होता. ‘महाविकास आघाडीचा विजय असो’, ‘अमित देशमुख तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है’,  अशा घोषांचा संपूर्ण परिसरात आवाज घुमला. महिला, युवती, पुरुषही मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.
या प्रचार रॅलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनिल बसपूरे, शेतकरी कामगार पक्षाचे अ‍ॅड. उदय गवारे, लातूर शहर लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक अहेमदखॉ पठाण, माजी नगरसेवक कैलास कांबळे, आसिफ बागवान, माजी माजी नगरसेवक विजयकुमार साबदे, नगरसेवक सचिन बंडापल्ले, माजी नगरसेवक इम्रान सय्यद, माजी नगरसेवक युनूस मोमीन, माजी नगरसेविकास रेहाना तांबोळी, तब्रेज तांबोळी, राजू गवळी, अथरोद्दिन काजी, हकीम शेख, पृथ्वीराज सिरसाठ, अशोक गोविंदपूरकर, प्रा. प्रविण कांबळे, नामदेव इगे, बाबा पठाण, कमल मिटकरी, वर्षा मस्के, शफी शेख, अ‍ॅड. वैभव सूर्यवंशी, मोहन माने, जीवन सूरवसे, रघूनाथ मदने, राहूल डूमणे, मोहन सूरवसे, मकबुल वलांडीकर, हरीभाऊ गायकवाड, इस्माईल शेख, विकास कांबळे, नबी नळेगांवकर, अविनाश बट्टेवार आदींसह काँग्रेस, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक,  महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR