20.3 C
Latur
Thursday, October 24, 2024
Homeलातूरशहर विधानसभेचा जाहीरनामा हा लोकाभिमुख असेल

शहर विधानसभेचा जाहीरनामा हा लोकाभिमुख असेल

लातूर : प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षात आर्वी गावात ३० कोटी पेक्षा अधिक विकास केली आहेत. या निवडणुकीतील काँग्रेसचा लातूर शहर विधानसभेचा जाहीरनामा हा लोकाभिमुख असेल, काँग्रेसने देशात पहिल्यांदा लातूरमध्ये महिलांना सिटी बस प्रवास मोफत केला, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले.
लातूर शहर मतदारसंघातील लातूर शहरानजीकच्या आर्वी येथे दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पदयात्रा केली, स्थानिक महिलांनी औक्षण करुन फुलांची पुष्पवृष्टी करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे स्वागत केले. यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर मतदार संघातील केलेल्या विकास कामांच माहितीपत्रक या पदयात्रेत भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना दिले. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, ट्वेंटीवन शुगरचे व्हॉइस चेअरमन विजय देशमुख, आर्वीचे निरीक्षक अनिल पाटील, आर्वीचे सरपंच पप्पू देशमुख, बापू चव्हाण, विलास भोसले, धनंजय गाडगीळ, ज्ञानेश्वर चौधरी, सचिन बंडापले,  चांदपाशा इनामदार, बाबा पठाण, सुलेखा कारेपूरकर, अशोक चव्हाण, राम स्वामी, विजय टाकेकर, राज क्षीरसागर, गणेश नवशिंदे, प्रल्हाद रणखांब, दयानंद जाधव, आदीसह काँग्रेस महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरीक  उपस्थित होते. आर्वी येथील भक्त्तिनगर  येथून पदयात्रेला सुरुवात झाली त्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भक्त्ती हनुमान मंदिर व श्री साई गणेश हनुमान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले.
त्यानंतर पदयात्रा साई रोड, तिरुपतीनगर,  पठाणनगर तर समारोप पु. अहिल्यादेवी होळकर नगर येथे झाला. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भक्त्तीनगर वसाहत विकसित झाली. लातूरचा विस्तार चारही दिशांनी झाला लातूरची उत्तरोत्तर प्रगती होत आहे, त्याचे लक्षण ही उत्तरेकडील वसाहत आहे. लातूर शहर मतदार संघात आम्ही कोट्यावधीचा निधी खेचून आणला. आर्वी  ग्रामपंचायत हादिमध्ये ३० कोटीचा निधीही आम्ही दिल्ली मुंबई वरुन खेचून आणला आर्वी ग्रामपंचायत मध्ये नागरीकरण झपाट्याने झाले आहे. आर्वीच्या विकासाची भूख अधिक आहे यासाठी आणखी आम्ही काम करु, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात महायुती सरकारने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडवला आहे, महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार या राज्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काँग्रेसचा लातूर शहर विधानसभेचा जाहीरनामा हा लोकाभिमुख असेल काँग्रेसने देशात पहिल्यांदा लातूरमध्ये महिलांना सिटी बस प्रवास मोफत केला असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR