पुणे : प्रतिनिधी
पुण्यामध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात शालेय विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणा-या नराधम स्कूल व्हॅन चालकाविरोधात नांदेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रसूल अत्तार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. रसूल अत्तार नांदेड परिसरात एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅन मधून घेऊन जात असे. ही स्कूल व्हॅन रस्त्यातच थांबवून विद्यार्थ्यांना अश्लील चाळे करत असल्याचे लक्षात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी याबाबत घरी माहिती दिली होती. त्यानंतर नागरिकांनी आरोपीला चोप देत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिल आहे.