शाहू महाविद्यालयात बेस्­ट फ्रॉम वेस्­ट उपक्रम साजरा

लातूर : प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण, संवर्धन व पाण्याची बचत’ या अभियान अंतर्गत महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ग्रीन क्लबच्या माध्यमातून बेस्­ट फ्रॉम वेस्­ट हा उपक्रम घेण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.  यावेळी त्यांनी सहभागी व उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. गव्हाणे म्हणाले की, आशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना स्वत:चा छोटासा उद्योग सुरू करता येऊ शकतो. त्यातून उद्योजक निर्माण होऊ शकतात. निरुपयोगी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, पर्यावरणपूरक व शोभेच्या वस्तू तयार करता येतात. असे प्राचार्य डॉ. गव्हाणे यांनी सांगितले. या उपक्रमात महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या टाकाऊ वस्तूपासून उदा. काच, नारळाच्या करवंट्या, कपडे, कापडी पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या,
प्लास्टिकचे डबे, रद्दी वर्तमानपत्र, वाह्यांचे कागद, युज अँड थ्रो पेन,  धातूच्या तारा, ड्रायफ्रूटची टरफले, प्लास्टिक कॅरीबॅग, चहाचे कागदी कप अशा टाकाऊ साहित्याचा  वापर करून  टिकाऊ, आकर्षक आणि जीवन उपयोगी वस्तू तयार करून सादर केल्या. यामधून पर्यावरणात टाकाऊ पदार्थांपासून होणारे प्रदूषण टाळणे, पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करणे हा मुख्य संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचा उद्देश होता.
या सोबतच या टाकाऊ पदार्थांपासून आकर्षक आणि उपयोगी वस्तू बनविल्यास आपल्या घरामध्ये शोभेच्या वस्तू विकत आणण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यातून पैशाची बचत होऊ शकते, व एक उद्योगही उभा राहू शकतो, हा संदेश देण्यात आला.  विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला भेट देण्यासाठी लातूर शहरातील पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी सतत कार्यरत असणारे सुपर्ण जगताप यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर परीक्षक म्­हणून डॉ. चंद्रशेखर दवणे, डॉ. अर्चना टाक आणि डॉ. बुध्­दाजी गाडेकर यांनी काम पाहिले.
या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, कदअउ समन्वयक, परीक्षानियंत्रक, व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट देवून सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी ग्रीन क्लब समन्वयक डॉ. किशोर शिंदे व ग्रीन क्लबचे अध्यक्ष रत्नदीप भुरे, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. उपक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|लातूरमध्ये दुष्काळाची छाया; सोयाबीन पिकाची पाहणी करत माजी आमदार धीरज देशमुख आक्रमक
03:57
Video thumbnail
Latur|सलगऱ्यात ९२ फुटी भव्य अस्थी विसर्जन घाट! देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ मोठा प्रकल्प
04:51
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:07
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13

Latest news