शिंदे गटाकडून मला मोठी ऑफर

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपाने मोठी ऑफर दिल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पक्ष कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना सोडून जाऊ नका म्हणून त्यांनी पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिका-­यांना साष्टांग दंडवत घातला होता. तर आता त्यांनी अजून एक गौप्यस्फोट करत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय शिरसाट यांनी मला ऑफर दिली होती. शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवा, आम्ही सर्व खर्च करू अशी ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला. संजय शिरसाठ यांनी शिंदे गटात येण्याची ऑफर दिल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

भाजपाने दिली राज्यपालपदाची ऑफर
तर भाजपाकडूनही आपल्याला राज्यपालपदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा खैरे यांनी केला. हरिभाऊ बागडे यांच्याप्रमाणे राज्यपाल करण्याची ऑफर देण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यपालपदासाठी आपल्याला दिल्लीतून ऑफर आल्याचा चंद्रकांत खैरे यांनी दावा केला. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा उद्धव ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत होते, असे सूतोवाच त्यांनी केले.

दोघांनी बांधला कौतुकाचा पूल
दरम्यान २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये चांगलीच चर्चा झाल्याचे दिसले. दोघांमधील हास्यविनोद हा चर्चेचा विषय ठरला. दोघांनी एकमेकांना काय कानमंत्र दिला यावर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा झाली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
उदगीर-जळकोट महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेनंतर CNG ऑटोचा स्फोट, रिक्षा जळून खाक, चालक बचावला
00:36
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00

Latest news