27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरशिऊर, उटी खु. अंकोली येथे विकास कामांचे लोकार्पण

शिऊर, उटी खु. अंकोली येथे विकास कामांचे लोकार्पण

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील शिऊर, उटी खुर्द, अंकोली येथील विविध विकास कामाचे लोकार्पण लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. प्रलंबित कामांची गती वाढवावी अशा सूचनाही त्यांनी संबधित अधिका-यांना दिल्या.
शिऊर येथे सदाशिव सूर्यवंशी यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेल्या जनावरांचा गोठा बांधकामाचे पूजन करण्यात आले. गावांतर्गत पेव्हर ब्लॉक रस्ताकामाचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते झाले. उटी खुर्द (ता. लातूर) येथील गफार पटेल यांच्या निवासस्थानी भेट देऊन गावातील नागरिकांच्या विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या. गावातील जलजीवन अंतर्गत व अन्य प्रलंबित कामांची गती वाढवून ती कामे तातडीने पूर्ण करणाच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिका-यांना दिल्या.
यावेळी विजय देशमुख, जगदीश बावणे, प्रमोद जाधव, अनुप शेळके, गुरुनाथ गवळी, श्रीनिवास शेळके, तुकाराम गोडसे, नानासाहेब जाधव, महेंद्र भादेकर, सचिन सूर्यवंशी, पांडूरंग सूर्यवंशी, रामदास सूर्यवंशी, भैरवनाथ सूर्यवंशी, माधव खोजे, विलास पाटील, महेंद्र सूर्यवंशी, बळवंत सूर्यवंशी, रसूल पटेल, दस्तगीर पटेल, महेंद्र मुळे, चंद्रकांत शिंदे, गणेश ढगे, मनोज मुळे, कल्याण पाटील, शाम मगर, मुरलीधर सूर्यवंशी, गफार पटेल आदीसह शिऊर, उटी खु., सावरगाव, अंकोली गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR