23.9 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeराष्ट्रीयशिमल्यात भीषण अपघात; ४ ठार, ३ गंभीर

शिमल्यात भीषण अपघात; ४ ठार, ३ गंभीर

जुब्बल : वृत्तसंस्था
हिमाचल राज्य परिवहन महामंडळाची रोहरू डेपोची बस कुड्डूहून गिलताडीकडे जात असताना झालेल्या अपघातात चालक आणि वाहकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील जुब्बल तहसील अंतर्गत कुड्डू येथून गिलताडी गावाकडे हिमाचल राज्य परिवहन महामंडळाची रोहरू डेपोची बस जात होती. बसमध्ये चालक आणि वाहकासह सातजण होते. सुमारे चार किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर बस टेकडीवरून खाली घसरली.

हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चालक आणि ऑपरेटरसह चार जणांचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिस प्रशासनाने अपघातस्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. एसडीएम जुब्बल राजीव संख्ये यांनी अपघाताला दुजोरा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR