34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रशिरूरमध्ये होणार तिरंगी लढत!

शिरूरमध्ये होणार तिरंगी लढत!

मंगलदास बांदल वंचितचे उमेदवार

शिरूर : बारामतीबरोबरच शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मतदारसंघातून खासदार डॉ. अमोल कोल्ह यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांनी शिवसेनेतून आयात करून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना या मतदारसंघातून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढत दुरंगी होणार असल्याचे वाटत असतानाच आता या मतदारसंघातून वंचितने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष असा प्रवास करून आलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना वंचितने शिरूर लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या मतदारसंघात डॉ. कोल्हे-आढळराव पाटील-बांदल अशी तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंगलदास बांदल हे अपक्ष म्हणून पुणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

विधानसभेच्या निवडणुकीत शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकिट देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात आंबेगाव तालुक्यातून त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
खंडणी तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यात मंगलदास बांदल हे दोन वर्षे तुरुंगात होते. रांजणगाव ‘एमआयडीसी’मधून खंडणी मागितल्याचे गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. काही दिवसांपूर्वी जामिनावर ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये बांदल यांना मे २०२१ मध्ये अटकदेखील करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR