29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरछ. संभाजीनगरात भीषण आग, सात जणांचा मृत्यू

छ. संभाजीनगरात भीषण आग, सात जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात अग्नितांडव पाहायला मिळाले. येथे एका टेलरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात ही घटना घडली आहे.

मध्यरात्री ४ वाजण्याच्या सुमारास या दुकानाला आग लागल्याची माहिती आहे. या अग्नितांडवात २ पुरुष, ३ महिला आणि २ मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. आगीत संपूर्ण कुटुंब संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जेव्हा ही आग लागली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य हे गाढ झोपेत असल्याची माहिती आहे. झोपेत असतानाच अचानक आग लागली आणि हे संपूर्ण कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मृतदेहांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

ज्या इमारतीला आग लागली ती तीन मजली इमारत होती. या इमारतीच्या खालच्या मजल्यावर टेलरचे दुकान होते. या दुकानात आग लागली आणि आग लागल्यानंतर पहिल्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या कुटुंबाचा गुदमरल्याने मृत्यू झाला आहे.

असीम वसीम शेख (३ वर्षे), परी वसीम शेख (वय २ वर्षे), वसीम शेख अब्दुल अजीज (वय ३० वर्षे), तनवीर वसीम शेख (वय २३), हमीद बेगम अब्दुल अजीज (वय ५०), शेख सोहेल अब्दुल अजीज (वय ३५), रेशमा शेख सोहेल शेख (वय २२ वर्षे), अशी मृतांची नावे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR