27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरशिवणी कोतल परिसरात वादळी वा-यामुळे पिके भुईसपाट

शिवणी कोतल परिसरात वादळी वा-यामुळे पिके भुईसपाट

शिवणी कोतल :  वार्ताहर
निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल परिसरात दि १५ ऑगस्ट रोजी साडेचार ते पाच  वाजण्याच्या सुमारास पाऊस व वादळीवा-यामुळे संपूर्ण पिके भुईसपाट झाली तर फळपिकांचे मोठे नुकसान झाले. यात शेत पिकांचे मोठे नुकसान झाले.
वडगाव,हाडगा,अबुलगा मेन या शिवणी लगत असलेल्या गावात  मूग, उडीद,सोयाबीन पिके संपूर्ण भुईसपाट झाली. यासोबतच बागायती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिक पुर्णपणे भुईसपाट झाल्याने ऊस उत्पादक शेतक-यापुढे मोठे संकट उभे टाकले आहे. तसेच फळबागांचे मोठे नुकसान यात झाले असून वादळी वा-यामुळे विद्युत पोल मोडले आहेत. तसेच शिवणी कोतल येथील शेतकरी कांत शेळके यांच्या म्हशीच्या दिड ते दोन वर्षांच्या  वासरावर बाभळीचे झाड पडल्याने ते मयत झाल आहे. शिवणी कोतल परिसरातील अर्ध्यापेक्षा अधिक शिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. तीस ते चाळीस मोठी झाडी उन्मळून पडल्याने फळ पिकांचेही यात मोठे नुकसान झाले आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR