वलांडी : प्रतिनिधी
मुलास दुचाकीचा धक्का लागल्याने व त्याची विचारणा केली असता तुला गाडी दिसत नाही का असे म्हणून फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना बोंबळी (ता. देवणी) येथे घडली आहे. या प्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात अनुसूचीत जाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि २१ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सूमारास पाणी आणण्यासाठी हातपंपावर जात असताना ईद्रजित तानाजी कारभारी याने दुचाकीवर असताना गाडी सावकास चालवा असे म्हणाले असता इंद्रजित याने जातिवाचक शिवागाळ तुला येत असलेली गाडी दिसत नाही का असे म्हणून लाथा बुक्याने मारहाण केली तसेच रात्री ८. ३० वाजण्याच्या सुमारास घरात घुसून तानाजी विश्वनाथ कारभारी अन्य सहका-यांनी जातिवाचक शिवागाळ करून लाथाबूक्याने मारून जख्मी केले.
यावेळी फिर्यादीची पत्नी व माझी मूलगी भांडण सोडवत असताना शिवीगाळ केली.
या प्रकरणी राजेंद्र शेषेराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात येथे इंद्रजित तानाजी कारभारी, व अन्य सहा जणांच्या विरोधात ३२४,४५२,२९४,३२३,५०६,१४३,१४७,१४८,१४९, व अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती ३(१)आर,३(१)एस,३(२) व्हिए नूसार गून्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर हे करीत आहेत.