25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रशेतकरी पण लाडका आहे हे सरकारने दाखवून द्यावे

शेतकरी पण लाडका आहे हे सरकारने दाखवून द्यावे

मुंबई : मराठवाडा आणि विदर्भात सध्या मुसळधार पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, शेतक-यांना जेवढ्या लवकर नुकसानभरपाईची रक्कम देता येईल ते पहावे आणि शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावे, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट करून सरकारला केले आहे.

राज ठाकरेंनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. कित्येक पिके अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. उभे असलेले पीक डोळ्यासमोर नष्ट होणे आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणे कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसानभरपाईची रक्कम देता येईल ते पहावे आणि सरकारने शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावे, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मराठवाड्याला सलग तिस-या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन हाहाकार माजला असून, नदी-नाल्याकाठच्या गावांना फटका बसला आहे. तर अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

शेतक-यांना मदत करताना हात आखडता नका घेऊ : राज ठाकरे
दरम्यान, सरकारने शेतक-यांना मदत करताना हात आखडता घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसानभरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावे, असे देखील राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये सरकारला उद्देशून म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR