17 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeलातूरश्रद्धा, सबुरीने साईबाबा बँक उच्च शिखर गाठेल

श्रद्धा, सबुरीने साईबाबा बँक उच्च शिखर गाठेल

लातूर : प्रतिनिधी
श्रद्धा आणि सबुरी ही श्री साईबाबा यांची शिकवण आहे. या शिकवणीला अनुसरुन वाटचाल करीत साईबाबा जनता सहकारी बँक बँकिंग क्षेत्रात उच्च शिखर गाठेल, असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
बँकींग क्षेत्रात २७ वर्षांपासून कार्यरत असणारी आणि आर्थिक संस्था ही नव्या उमेदीने सर्व अद्यावत सोयींसह सभासदांच्या सेवेत कार्यरत झालेल्या साईबाबा जनता सहकारी बँकेच्या सभासदांच्या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन दि. २ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता माजी मंत्री आमदाा अमित देशमुख यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात झालेल्या या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. शिवाजी काळगे होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय साळूंके, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईज शेख, विलास सहकारी बँकेचे चेअरमन अ‍ॅड. किरण जाधव, जिल्हा बँकेचे संचालक अशोक गोविंदपूरकर, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, विलास सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, शिंदे-चव्हण अ‍ॅण्ड गांधी कंपनीचे सीए प्रवीण प्रजापती, काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भतांब्रे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापूरे, द्वारकादास श्यामकुमार वस्त्र दालनाचे संचालक तुकाराम पाटील, सचीन वाणी, डॉ. एन. जी. मिर्झा, साईबाबा जनता सहकारी बँकेचे चेअरमन जे. जी. सगरे, व्हाईस चेअरमन सोनू डगवाले, संचालक  एस. बी. जटाळ, सत्तारखा पठाण, विष्णुदास धायगुडे, इसरार सगरे, ओमप्रकाश गलबले, श्रीशैल कोरे, वाय. एस. मशायक, अकबर सगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत पाटील, शाखाधिकारी सोमेश्वर भोसले, शाखाधिकारी विष्णुदास कासले, शाखाधिकारी खदीर शेख उपस्थित होते.
जे. जी. सगरे, इसरार सगरे व त्यांच्या सहकार्यांनी बुडत असलेली साईबाबा जनता सहकारी बँक पुनर्जिवीत केली, त्याबद्दल त्यांचे कौतूक करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले, लातूर हे विकासरत्न विलासराव देशमुख यांच्यासाठी जीव की, प्राण होते. लातूर आहे तर आपण आहोत, ही त्यांची भावना होती. त्यानूसार आपण सर्वचजण लातूरच्या जढण घडणीसाठी कार्यरत आहोत. आपल्या शेजारील बीडची परिस्थिती आपण पाहात आहोत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे नागरिक म्हणतात आम्हाला सुखाने जगण्यासाठी आमचा लातूर जिल्ह्यात समावेश करा. खरे तर ही तमाम लातूरकरांनी लातूरला जपल्याची पावती आहे. हे सर्व विकासरत्न विलासराव देशमुख यांनी उभे केले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वात नावारुपाला आली. शुन्य टक्के व्याज दराने ५ लाख रुपये देणारी लातूर जिल्हा बँक जगातील पहिली बँक आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा तमाम लातूरकरांमध्ये असल्यामुळेच लातूरात शांती, कायदा, सुव्यवस्था अबाधित आहे.
लातूर मल्टिस्टेटचे चेअरमन तथा साईबाबा जनता सहकारी बँकेचे संचालक इसरार सगरे यांचे सहकारातील काम तसेच संघटन कौशल्य उत्तम असल्याचे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले,  बँक पारदर्शक चालली पाहिजे. गुणवत्तेवर व्यवसाय केला तर व्यवसाय टिकतो. गुणवत्ता आणि लातूरकर यांचे एक वेगळे नाते  आहे. त्यामुळे गुणवत्ता टिकुण आहे. लातूरात कायदा व सुव्यवस्था आपण उत्तम राखली आहे आता सरकारी अधिकारी कर्मचा-यांकडून लातूर शहरातील नागरिकांची पीळ वणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या काळात असे कधीच नव्हते सध्या बीड जिल्हा अडचणीत आहे त्याला अडचणीतून बाहेर राज्य सरकारने  काढावे, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी  लहान-लहान सेक्टरला बँकेशी जोडले तर बँक प्रगती करेल, असे नमुद करुन बँकेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक गोविंदपुरकर, अभय साळूंके, सचिन वाणी यांनीही शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक इसरार सगरे यांनी केले. साईबाबा जनता सहकारी बँकेची स्थापना १९९७ मध्ये   झाली. लातूर, औसा, निलंगा व चाकुर अशा चार ठिकाणी बँकेच्या शाखा आहेत. २८ हजार सभासद असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रारंभी साईबाबा व विकासरत्न विलाससराव देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करुन दीपप्रज्वलनाने स्नेहमेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते झाले. पाहूण्यांचे स्वागत जे. जी. सगरे, इसरार सगरे, सोनू डगवाले, एस. बी. जटाळ, सत्तारखा पठाण, एम. आर. पाटील, ओमप्रकाश गलबले, विष्णुदास धायगुडे, वाय. एस. मशायक, अकबर सगरे, विष्णुदास कासले यांनी केले. कार्यक्रमास अ‍ॅड. फारुक शेख, व्यंकटेश पुरी, प्राचार्य एकनाथ पाटील, नबी नळेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR