24 C
Latur
Saturday, July 5, 2025
Homeलातूरश्रीमती देशमुख महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा सुरळीत  

श्रीमती देशमुख महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा सुरळीत  

लातूर : प्रतिनिधी
येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाच्या केंद्र क्रमांक ५०४ वर एकूण ४०१ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यात विज्ञान विभागाचे ३०० तर वाणिज्य विभागाचे १०० विद्यार्थी समाविष्ट आहेत. परीक्षेच्या पहिल्या दिवशी लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.
आजपर्यंतच्या सर्व विषयाच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या असून, यापुढेही केंद्रावरील परीक्षार्थींना कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी प्राचार्य डॉ. अजय पाटील, केंद्रप्रमुख प्रा. दादासाहेब लोंढे, सहाय्यक केंद्रप्रमुख डॉ. अरुणा शिराळकर, प्रकाश पाटील, संजय मुंडे डॉ. वेदप्रकाश मलवाडे, प्रा. डॉ. बाळू कांबळे प्रा. शिवाजी मोहाळे, प्रा. संजयादेवी पवार, प्रा. डॉ. सविता किर्ते, प्रा. डॉ. सुरेखा बनकर व सर्व पर्यवेक्षक व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR