लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्ञानदानाचे अखंड कार्य करत असलेल्या श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत सर्वानुमते कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपदी शैलेश लाहोटी सचिवपदी आशिष बाजपाई, उपाध्यक्षपदी राजेंद्रकुमार मालपाणी, सहउपाध्यक्ष पदी दिनेश इन्नानी, सहसचिवपदी शरदकुमार नावंदर, उप सहसचिवपदी सुहास शेट्टी, कोषाध्यक्षपदी हुकूमचंद कलंत्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेद्वारा पुढील पाच वर्षासाठी निवड केलेल्या कार्यकारिणीमध्ये विश्वस्त मंडळ अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, विश्वस्त डॉ. अनिल राठी, कुमुदिनी भार्गव, शांतीलाल कुचेरिया, ईश्वरप्रसाद डागा यांचा समावेश आहे. तर कार्यकारी मंडळ अध्यक्ष शैलेश लाहोटी, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार मालपाणी, सह उपाध्यक्ष दिनेश इन्नानी, सचिव आशिष बाजपाई, सहसचिव शरदकुमार नावंदर, उप सहसचिव सुहास शेट्टी, कोषाध्यक्ष हुकूमचंद कलंत्री, संचालक कमलकिशोर अग्रवाल, बालकिशन बांगड, संजय बियाणी, लक्ष्मीकांत कर्वा, संजय भराडीया, सीए किशोर भराडीया, आशिष अग्रवाल, चैतन्य भार्गव, निखील राठी, रवींद्र वोरा, माजी विद्यार्थी प्रतिनिधी स्रेहल उटगे यांचा समावेश आहे. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी विधिज्ञ श्रीकांत उटगे व सहाय्यक निवडणूक अधिकारी अमोल निम्बुरगे यांनी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडली.
अध्यक्षीय समारोपात शैलेश लाहोटी यांनी संस्थेच्या कर्तुत्वाचा आलेख सदर केला. यावेळी संस्थेद्वार संचालित सर्व विद्यालय व एस एम मार स्विमिंग पूल आदीच्या अलोकिक कार्याचा अहवाल चित्रफितीतून सादर करण्यात आला. विषयपत्रीकेनुसार सर्व विषय घेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक सचिव आशिष बाजपाई यांनी केले. सर्व सदस्यांनी सक्रीय सहभाग नोंदवीत निवडणूक प्रक्रिया बिनविरोध संपन्न केल्याबद्दल, आभार प्रदर्शन शरदकुमार नावंदर यांनी केले.
















