सोलापूर –महापलिका आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या मिटिंग हॉल येथे श्री सिद्धरमेश्वर यात्रेच्या नियोजन साठी बैठक आयोजित करण्यात आले होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले,नगर अभियंता लक्ष्मण चलवादी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार भोसले, आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी संबंधित अधिकारी व सर्व विभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नदीध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे, आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन व्यवस्था करण्यात यावे, मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे, श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंग येथील परिसर व मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करण्यात यावी तसेच नंदीध्वज मिरवणूक सोबत ऍम्ब्युलन्स व अग्निशामक दलाचे वाहन कार्यरत ठेवावे. श्री सिद्धेश्वर मंदिर समोरील उजवी बाजू कडील रस्ता यात्रेपूर्वी व्यवस्थित दुरुस्ती करून त्यावरील खडे, दगड काढून त्या ठिकाणी व्यवस्थित रोलिंग करून मॅट ची व्यवस्था करण्यात यावी.अश्या सूचना महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली -उगले यांनी अधिकाऱ्यांना दिले.