20.2 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeपरभणीसंक्रांती निमित्त नांदेड-काकिनाडा विशेष गाडी धावणार

संक्रांती निमित्त नांदेड-काकिनाडा विशेष गाडी धावणार

परभणी : संक्रांतीच्या सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड-काकिनाडा-नांदेड विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली आहे.

गाडी क्रमांक ०७४८७ नांदेड-काकिनाडा ही गाडी दि.६ आणि १३ जानेवारी(सोमवारी) रोजी दुपारी २.२५ वाजता नांदेड येथून सुटेल व मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, सिकंदराबाद, वारंगल, रायानपडू, राजमुंद्री, आणि सामलकोट मार्गे काकिनाडा येथे दुस-या दिवशी मंगळवारी सकाळी ८.१० वाजता पोहचेल. तर गाडी क्रमांक ०७४८८ काकिनाडा -नांदेड ही गाडी दि.७ आणि १४ जानेवारी(मंगळवारी) रोजी सायंकाळी ६.१० वाजता काकिनाडा येथून सुटेल व सामलकोट, राजमुंद्री, रायानपडू वारंगल, सिकंदराबाद, निजामाबाद, बासर धमार्बाद, आणि मुदखेड मार्गे नांदेड येथे दुस-या दिवशी बुधवारी दुपारी ३.१० वाजता पोहचेल. या गाडीत एकूण २२ डब्बे असतील ज्यात जनरल, स्लीपर, वातानुकुलीत डब्यांचा समावेश आहे.

दरम्यान, प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा नजीकच्या आरक्षण केंद्रावरून तिकीट आरक्षण करावे. तसेच प्रवास दरम्यान सुरक्षितता आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR