29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeलातूरसंगनमत करुन घरातील साहित्य पळवले; जिवे मारण्याची धमकी

संगनमत करुन घरातील साहित्य पळवले; जिवे मारण्याची धमकी

लातूर : प्रतिनिधी 
येथील कपीलनगरमधील हलीमा जिलानी शेख यांच्या घरी चार-पाच जणांनी संगणमत करीत घरात प्रवेश करुन घरातील साहित्य टेम्पोमध्ये भरुन नेल्याची घटना दि. १८ मार्च रोजी घडली. तसेच आरोपींनी शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे.
पोलिसांनी सांगीतले, कपीलनगरमध्ये हलीमा जिलानी शेख ही महिला तिचा पती जिलानी, दोन मुले, दोन सुनांसह जगन्नाथ आप्पाराव बिराजदार यांच्याकडे गेल्या २७ वर्षांपासून भाड्याने राहात होते. सन २०२० मध्ये शेख यांनी आप्पाराव बिराजदार यांच्याकडून ते घर विकत घेतले. तेव्हापासून जगन्नाथ आप्पाराव बिराजदार जागेच्या कारणावरुन सतत भांडण तक्रारी करीत होता. दि. १८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुूमारास विशाल गायकवाड, बबिता कांबळे, जगन्नाथ बिराजदार, उमाबाई जगन्नाथ बिराजदार व अनोळखी दोन महिला व दोन पुरुषांनी शेख यांच्या घरात घुसून घरावरील पत्रे काढून टाकले. घरातील भांडे, फ्रि ज, इतर साहित्यांची मोडतोड करुन अंदाजे २५ हजार रुपयांचे नूकसान केले. घरातील सर्व साहित्य टमटममध्ये घालून घेऊन गेले. साहित्यात घरातील कपाट, रोख एक लाख रुपये, सोन्याचे दोन तोळ्याचे गलसर होते.
घरातून निघा म्हणून धक्काबुक्की, शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद हलीमा जिलानी शेख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिल्यावरुन पोलिसांनी विशाल गायकवाड, बबिता कांबळे, जगन्नाथ आप्पाराव बिराजदार, उमाबाई जगन्नाथ बिराजदार यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR