27.5 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांना १५ दिवसांचा तुरुंगवास!

संजय राऊतांना १५ दिवसांचा तुरुंगवास!

कोर्टाचा निकाल; सोमय्यांमुळे अडकले

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात माझगाव सेशन्स कोर्टाने निकाल दिला आहे.

कोर्टाने राऊत यांना दोषी ठरवले आहे. संजय राऊत यांनी सोमय्या दाम्पत्याने शौचालय निर्मितीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. हा घोटाळा १०० कोटींचा असून या पैशाचा अपव्यय केल्याचा आरोप केला होता. संजय राऊतांना १५ दिवसांच्या तुरुंगवासाबरोबरच २५ हजारांचा दंड ठोठावला आहे.

वरच्या कोर्टात दाद मागणार : सुषमा अंधारे
मला वाटत नाही की, यावर फार काही चिंता करण्याचं कारण आहे. विषय गांभीर्याने नक्की हाताळला जाईल. परंतु लगेचच संजय राऊत हे दोषी आहेत, असे समजण्याचे काही कारण नाही. कालच्याच रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणात निवडणूक आयोगाने रडीचा डाव खेळत त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. काल कार्यालयाने दणका देत ते योग्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे खाली काही जर आमच्याकडून राहिल्या असतील तर आम्ही वरच्या कोर्टात त्रुटींची पूर्तता करून नव्याने दाद मागू, असे उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

मेधा किरीट सोमय्या यांची याचिका
मानहानी प्रकरणामध्ये कोर्टाने राऊतांना दोषी ठरवले आहे. सेशन्स कोर्टात किरीट सोमय्यांची पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी एक याचिका दाखल करत राऊतांवर मानहानीचा दावा केला होता. संजय राऊत यांना कोर्टाने १५ दिवसांची कैद आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अंतर्गत राऊत यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR