28.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeसोलापूरसंभाजी आरमारच्या विवाह सोहळ्यात ७ जोडपे विवाहबद्ध

संभाजी आरमारच्या विवाह सोहळ्यात ७ जोडपे विवाहबद्ध

सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त संभाजी आरमारच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. गवळी वस्ती आकाशवाणी केंद्र येथे हजारो जन समुदायाच्या साक्षीने हिंदू धर्म पद्धतीने विधिवत सात जोडपी विवाहबद्ध झाली.

छत्रपती शिवरायांच्या आरतीने विवाह सोहळ्याचा शुभारंभ झाला. सायंकाळी ६. २७ वा. च्या गोरज मुहूर्तावर नयनरम्य वातावरणात हा आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता. संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे व कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख सागर ढगे यांनी या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले होते. विवाहबद्ध झालेल्या जोडप्याना लग्नाचा पेहराव, संसारोपयोगी भांडी, मणी मंगळसूत्र इ. भेट स्वरूपात देण्यात आले.

उपस्थित सर्वांसाठी भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती.या विवाह सोहळ्याला माजी उपमहापौर नानासाहेब काळे, काँग्रेसचे शहरप्रमुख चेतन नरोटे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, माजी नगरसेवक अनंत जाधव, विनोद भोसले, बापू ढगे, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, उपशहरप्रमुख संतोष कॅगनाळकर, पोलीस निरीक्षक वाघमारे, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे हाजी मतीन बागवान, शिवसेनेचे लहू गायकवाड, नागेश खरात, पेंटप्पा गड्डुम, यशवंत पातरूड, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष उज्वला पाटील, शहर कार्याध्यक्ष चित्र कदम आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहळा यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, दक्षिण तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, जिल्हा संघटक अमित कदम, प्रा. मल्लिकार्जुन पोतदार, महेश घोडके, किरण ताकतोडे, पिंटू औरंगे, सचिन गायकवाड, अविनाश विटकर, गणेश निंबाळकर, महिला अगदी पदाधिकारी उमा रजपूत, रेखा व्हनकडे, संध्या हेब्बाळकर, वर्ष ढगे, अश्विनी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR