22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रसंविधानाच्या ताकदीमुळे चहाविक्रेता पंतप्रधान झाला

संविधानाच्या ताकदीमुळे चहाविक्रेता पंतप्रधान झाला

चांदोरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान भाजप सरकार सत्तेत आल्यावर बदलले जाईल अशी अफवा पसरवून देशात जाती-पातीचे राजकारण केले जात आहे. आज संविधानाची ताकद असल्यामुळे दहा वर्षांपूर्वी सामान्य कुटुंबातील चहा विकणारा माणूस पंतप्रधान झाला.

तो माणूस संविधान कसे बदलेल, असा विचार देखील मनात कसा येतो, असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले. सायखेडा येथे महायुतीचे उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचार सभेप्रसंगी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, काँग्रेसने केवळ जातीचे राजकारण केले, मुस्लिम समाजाबद्दल चुकीची माहिती देऊन घाबरवले जात आहे. मुस्लिमांच्या केसाला धक्का लागणार नाही. त्यांनाही सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ मिळतो, विकास कामे काय असतात हे दहा वर्षांत लोकांनी पाहिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR