22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeलातूरसकल धनगर समाजाचे जिल्ह्यातील आमदारांचा घरासमोर हलगी आंदोलन

सकल धनगर समाजाचे जिल्ह्यातील आमदारांचा घरासमोर हलगी आंदोलन

लातूर : प्रतिनिधी
धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी दि. २२ सप्टेंबर रोजी सकल धरगर समाजाच्या वतीने जिल्ह्यातील आमदारांच्या निवासस्थानासमोर हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले.

धनगर समाजाच्या मागणीबाबत सर्वच आमदारांनी आपली भूमीका स्पस्ट करावी व आपला पाठींबा असेल तर तात्कळ पाठींब्याचे पत्र देऊन आरक्षण मिळवून द्यावे यासाठी अहमदपूर, चाकूरचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीरचे आमदार तथा कॅबीनेट मंत्री संजय बनसोडे, निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, औशाचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या घरासमोर हलगी वाजवुन आंदोलन करीत धरगर समाजाच्या मागणीला पाठींबा असेल तर पाठींब्याचे पत्र द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तेव्हा उपरोक्त आमदारांनी पाठींब्याचे पत्र दिले. लातूर शहराचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्याशी सकल धरगर समाजाच्या प्रतिनिधींनी दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता माजी मंत्री आमदार अमित देशमुख व आमदार धिरज देशमुख यांनीही धनगर समाजाच्या मागणीला पाठींबा दिला असुन पाठींब्याचे पत्र देत असल्याचे सांगीतल्याची माहिती लातूर जिल्हा धनगर समाजाचे युवा नेते बालाजी बैकरे यांनी दिली.

या आंदोलनात शिवाजीराव खांडेकर, भिमाशंकर येणुरे, नागनाथ बोडके, मेजर काशीनाथ नदीवाडे, रामेश्वर हाके पाटील, सुखदेव गुमनर, सुनील सुरनर, माधव सुरनर, मेजर शिवाजीराव शिंदे, गोविंदराव म्हेत्रे, माधव सुरनर, नारायण राजुरे, नारायण काचे, बाळासाहेब बेडदे, दत्तू कामाळे, सरपंच हानुमंत लवटे, रामचंद्र चिगळे, धोंडीराम पाटील, झटींग अण्णा म्हेत्रे, नामदेव काळे, प्रदिप रकटे, राम कांबळे ईत्यादीसह त्या त्या तालुक्यातील तरुण व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR