16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeलातूरसत्ताधा-यांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

सत्ताधा-यांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

लातूर : प्रतिनिधी
राज्य व केंद्र सरकारमधील लोकांनी विकासकामे न करता समाजातील तेढ कसे निर्माण होईल याकडेच सरकार प्रयत्न करत असल्याचा घणाघात राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त करुन विकास, विश्वास, प्रगती करणा-या काँग्रेसच्या पाठीमागे येणा-या विधानसभा निवडणुकीत ऊभे राहून अमित देशमुख, धीरज देशमुख यांना अधिकाधिक मताधिक्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भातांगळी जिल्हा परीषद सर्कलमधील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद बैठक रविवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जागृति शुगरचें उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, जिल्हा परिषदेचे माजी  अध्यक्ष संतोष देशमुख, जनार्दन वंगवाड, काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, वाल्मीक माडे, मनोज पाटील, राजेसाहेब पाटील, मधुकर पाटील, अ‍ॅड.  श्रीरंग दाताळ, प्रताप पडिले, जब्बार सगरे, सुनील पडिले, राजकुमार पाटील, अनुप शेळके, अ‍ॅड. प्रवीण पाटील, दगडू पडिले, सचिन दाताळ, शंकरराव बोलंगे, रघुनाथ शिंदे, हरिराम कुलकर्णी उपस्थित होते
विकासाची, परंपरा कायम ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या
लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात विकासाची कामे केलेली आहेत. विविध योजना राबवून शेतक-यांना  आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम याच मांजरा परिवाराने केले असून आपली प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी. आमदार धिरज देशमुख यांना पुन्हा एकदा निवडून द्यावे असे आवाहन माजी आमदार वैजनाथराव शिंदे यांनी यांनी केले.
यावेळी आबासाहेब पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके,  जनार्दन वंगवाड, जब्बार सगरे, हरीश बोळंगे, प्रा  संदीप शिरसाट, सुशांत मुळे, कमलाकर अनंतवाड यांच्यासह यांनी  यांनी विचार मांडले. याप्रसंगी भातांगळी गणातील जितेंद्र स्वामी, संभाजी रेड्डी, सतीश पाटील, बंडू पाटील, गरड, डोके, मुळे, वीर, बाजार समितीचे संचालक,  मांजरा रेणा विलास साखर कारखान्याचे संचालक मंडळ, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, सोसायटीचे चेअरमन, सरपंच शैक्षणीक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR