26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रसन्माननीय उद्धव ठाकरे, जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो...

सन्माननीय उद्धव ठाकरे, जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो…

राज ठाकरेंच्या भाषणाने मेळाव्याची सुरुवात

मुंबई : राज्यात ‘हिंदी सक्ती’चा निर्णय महायुती सरकारकडून झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट पसरली. याविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सरकारला हिंदी सक्तीचा जीआर रद्द करावा लागला. या सर्व पार्श्वभूमीवर आज (५ जुलै) विजय मेळावा वरळी डोममध्ये झाला. या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून घणाघाती प्रचार केला. राज ठाकरे यांनी बोलताना सुरुवातीलाच ‘सन्माननीय उद्धव ठाकरे’ म्हणत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे माझ्या जमलेल्या मराठी बांधवांनो अशी सुरुवात केली. आजवर कोणालाच जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवल्याचा टोलाही राज यांनी लगावला.

राज म्हणाले की, आजच्या मेळाव्याला घोषणा हीच आहे- कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पहायचं नाही. कुणाला न विचारता निर्णय लादला. तुमच्याकडे सत्ता आहे विधान भवनात आणि आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. दादासाहेब भुसे आले होते. म्हणत होते, मी काय बोलतो ते ऐकून घ्या. मी म्हणालो, ऐकून घेईल पण ऐकून घेणार नाही.

मला म्हणे केंद्राच्या शिक्षण धोरणात हिंदी मुद्दा आहे. महाराष्ट्रात यांनी प्रयत्न करून पाहिला. दक्षिणेतील राज्य यांना विचारत पण नाही त्याशिवाय का यांनी माघार घेतली. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान कोणता विषय तिसरा घेणार आहेत. मराठीच तिसरा विषय घ्यायला हवा. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शहा म्हणतात, ज्याला इंग्रजी येते त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणवून. पण तुम्हाला येतं कुठे? ते पुढे म्हणाले की, आम्ही मराठी भाषा कधी लादली का? हिंदी फक्त २०० वर्षांपूर्वीची आहे. यांनी आत्ता चाचपडून पहिलं. यांना काय मजाक वाटला का सक्ती करायला? अशी विचारणा त्यांनी केली. वेगळा प्रयत्न करून पहिला. ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकली मग काय झालं? देवेंद्र फडणवीस इंग्रजी शाळेत शिकले, दादा भुसे मराठी शाळेत शिकून मंत्री झाले. कुणाची मुले कुठे शिकतात याची लिस्ट आहे आमच्याकडे, असे सांगत त्यांनी देशातील नेत्यांची यादीच वाचून दाखवली.

जे बाळासाहेबांना, इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं

भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास ठाकरी शैलीमध्ये जोरदार टोला लगावला आहे. जे बाळासाहेबांना जमले नाही, इतरांना जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले, असे राज ठाकरे म्हणाले. आज हिंदी सक्तीविरोधाचा मोर्चा निघायला पाहिजे होता.

मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो, याचे एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभे राहिले असते. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. आजचाही मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिले असते. पण पाऊस आहे. आज २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत… जे माननीय बाळासाहेबांना जमले नाही, जे अनेकांना जमले नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमले, असे विधान राज ठाकरे यांनी या सभेच्या निमित्ताने झालेल्या ठाकरे बंधूंच्या ऐक्यावरून केले.

चॅनल्सवाल्यांची घेतली हजेरी
राज ठाकरे पुढे म्हणाले की, इथे चॅनल्सचे कॅमेरे लागलेले आहेत. आता संध्याकाळी सगळे सुरू होईल. दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कुणी कमी हसले का, कुणी बोलताहेत का. आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच अनेकांना रस असतो, असा टोलाही राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.

मराठी हाच अजेंडा
या सभेसाठी कुठलाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा, असे ठरले होते. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचे नाही. खरं तर सध्या हिंदीवरून निर्माण झालेला हा प्रश्नच अनाठायी होता. महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती लादण्याची काही गरज नव्हती. कशासाठी आणि कुणासाठी तुम्ही लहान मुलांवर हिंदी भाषेची सक्ती करताय.. कुणाला विचारायचं नाही,

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR