28.4 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रसप्तशृंगी गडावर टेम्पो ट्रॅव्हलरला आग, बस जळून खाक

सप्तशृंगी गडावर टेम्पो ट्रॅव्हलरला आग, बस जळून खाक

वणी : सप्तशृंगी गडावर जाणा-या टेम्पो ट्रॅव्हलरला सोमवार (दि. २०) रोजी रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागल्याने जळून खाक झाली आहे. बस गडावर जात असताना बसमधून अचानक धूर येऊ लागल्याने वाहनचालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली. त्यानंतर बसमधील प्रवाशांना बसमधून सुखरूप खाली उतरविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसून बस मात्र पूर्ण जळून खाक झाली आहे. याबाबत माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सर्वतोपरी मदतकार्य केले. पाण्याचा टँकर आणून आग विझविण्यात यश आले आहे. सप्तशृंगी गडावरील नागरिकांनी तातडीने धाव घेतल्याने वेळीच आग विझविण्यात यश आले आहे.

उष्णता अधिक असल्याने वाहनातील वायरच्या बिघाडामुळे बस जळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून आपत्ती व्यवस्थापन पथक, ट्रस्ट, रोपवे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे. दोन चालक, दहा महिला, नऊ पुरुष असे एकूण २१ प्रवासी वाहनात होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR