24.9 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeलातूरसमग्र शिक्षा अभियानाच्या कंत्राटी कर्मचा-यांचे आमरण उपोषण सुरू

समग्र शिक्षा अभियानाच्या कंत्राटी कर्मचा-यांचे आमरण उपोषण सुरू

लातूर : प्रतिनिधी
समग्र शिक्षा अभियान मधील कंत्राटी कर्मचा-यांचे त्यांच्या कायम करण्या संदर्भात व विविध मागण्यासाठी दि. ४ मार्च पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. विविध संघटनेच्या पदाधिकारी केंद्रप्रमुख संघटना, मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना , कास्ट्राईब संघटना इत्यादी संघटना यांचे पदाधिकारी प्रत्यक्ष येऊन सदर अमरण उपोषणास पाठिंबा दिला आहे.
तसेच तालुक्याचे त्या-त्या कार्यक्षेत्रातील १७ आमदार यांनी पहिल्या दिवशी प्रत्यक्ष उपोषण कर्त्यास भेट देऊन मार्गदर्शन केले व आपला प्रश्न विधान भवनात सकारात्मक रित्या मांडण्यात येईल असे आश्वासनही दिले. दि. ४ मार्च रोजी सर्व जिल्ह्यातील मिळून साधारणत: १ हजार ५६४ कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. दि. ५ मार्च रोजी सर्व जिल्ह्याची मिळून २ हजार ५६४ हून अधिक कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. सदरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व अन्य  आमदार यांनी आझाद मैदान मुंबई येथे जाऊन उपोषण करणारे कंत्राटी बंधू-भगिनी यांची भेट घेऊन. शासनाने याबाबत नियुक्त केलेल्या समितीची बैठक घेऊन सदरचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन देत लवकरच याबाबत समितीची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR