36.8 C
Latur
Friday, May 2, 2025
Homeसोलापूरसमता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त जी.एम संस्थे तर्फे अभिवादन

समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त जी.एम संस्थे तर्फे अभिवादन

सोलापूर : प्रतिनिधी
जगत ज्योती समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वर चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास जी.एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जी.एम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख व सामाजिक कार्यकर्ते जी.एम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन दीप प्रज्वलित करून समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना जी.एम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड म्हणाले की १२ व्या शतकातील, महान संत, जगदज्योति, समतानायक, महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंटप नावाचे व्यासपीठ तयार करून या व्यासपीठाच्या साह्याने कर्मकांडाच्या मगरमिठीतून धर्माची मुक्तता करण्यासाठी तसेच त्याला व्यवहारिक व लोकशाही विश्वधर्माचे स्वरूप देण्यासाठी महान ऐतिहासिक कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं त्या काळी धार्मिक, सामाजिक, आर्थिक जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली त्याचप्रमाणे जातीभेद व अनिष्ट रूडी परंपरेला कडाडून विरोध केला.

महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते जीएम संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ हौशेट्टी जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड दत्ता शिंदे आप्पासाहेब गायकवाड नरेंद्र शिंदे कुंदन वाघमारे नरेश कदम अजय कोळेकर मॅडी दुपारगुडे यशपाल कांबळे निहाल क्षीरसागर नंदकुमार चंदनशिवे आदी पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR