39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रसमरजीतसिंह घाटगेंचा उमेदवारी अर्ज दाखल

समरजीतसिंह घाटगेंचा उमेदवारी अर्ज दाखल

कागल : शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे तसेच त्यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जोरदार शक्तीप्रदर्शन करत सकाळी पावणेअकरा वाजता त्यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले.

यावेळी कागल शहरातील प्रमुख मार्गावरून जोरदार रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे, टोप्या, बॅनरमुळे संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय झाले होते. कार्यकर्त्यांच्या हातामध्ये असलेले विविध प्रकारचे बॅनरने लक्ष वेधून घेतले होते.

यावेळी गोकुळ संघाचे माजी अध्यक्ष रणजीत सिंह पाटील, अखिलेश सिंह घाटगे, व्ही.बी.पाटील, भैय्या इंगळे, आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR