33.5 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, क्लीनरचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, क्लीनरचा मृत्यू

नागपूर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यात आता पुन्हा एकदा या मार्गावर अपघाताची घटना समोर आली आहे. मार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर काँक्रीट टँकर धडकला. यात टँकरच्या क्लीनरचा मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी आहे. सतीशसिंग विजयसिंग (वय ३७) असे यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रामचंद्र पाल (वय ३६) असे टँकरचालकाचे नाव आहे. जखमी रामचंद्र याला उपचारासाठी एम्समध्ये भरती करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हान येथील रहिवासी राजनसिंगट्रक घेऊन वर्धा येथून नागपूरकडे येत होता. दरम्यान, ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने राजनसिंगने ट्रकला रस्त्याच्या कडेला पार्क केले. दरम्यान सतीश आणि रामचंद्र टँकरने नागपूरकडे येत होते. रामचंद्रला डुलकी आल्याने त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि उभ्या ट्रकला धडक दिली. यात क्लीनर सतीशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली.

दरम्यान, रामचंद्रला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यानंतर क्रेनच्या मदतीने वाहनांना रस्त्याच्या कडेला करण्यात आले. रामचंद्र याला डुलकी आल्याने त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि उभ्या ट्रकला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR