23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरसलग सहा वर्षांपासून अन्नसेवा सुरू

सलग सहा वर्षांपासून अन्नसेवा सुरू

लातूर : प्रतिनिधी
गावातून भल्या पहाटे शेतमाल विक्रीसाठी घेवून लातूर बाजार समितीत दाखल होतात. या येणा-या शेतक-यांच्या जेवनाची सोय व्हावी म्हणून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त बाजार समितीच्या आवारात दि. २५ मे २०१८ रोजी ५ रूपयांमध्ये रूचकर पोटभर जेवणाची सोय उपलब्ध करून दिली. सदर उपक्रम सलग सहा वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. आजपर्यत या रूचकर जेवनाचा आस्वाद ८६ हजार ६२१ शेतक-यांनी घेतला आहे.
देशपातळीवर नावाजलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला कोटयावधी रूपयांची उलाढाल होते. लातूरच्या आडत बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतमालाला योग्य भाव व रोख व्यवहाराचा विश्वास शेतक-यामध्ये असल्याने लातूर जिल्हयासह सिमेलगतच्या जिल्हयातील व राज्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणारे शेतकरी सकाळी-सकाळी नाष्टा न करताच घराबाहेर पडतात.
बाजारपेठेत शेतमात घेवून आलेल्या शेतक-यांना आपला शेतमाल विक्री होईपर्यंत उपाशी पोटीच रहावे लागते. तर कांही शेतकरी हॉटलमध्ये नाष्टा, जेवण करतात. शेतक-यांची ही आडचण लक्षात घेऊन लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतक-यांसाठी ५ रुपयांमध्य अल्पदरात पोटभर जेवणाची  सुविधा उपलब्ध करून देण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या जयंतीपासून (दि. २५ मे २०१८ पासून) राबवला आहे. सदर उपक्रम गेल्या सहा वर्षापासून अखंडपणे सुरू आहे.
आडत बाजार पेठेत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतक-यांना आडत्याकडून शेतमाल विक्री केल्याची पावती व जेवनासाठी ५ रूपयांचे कूपन दिले जाते. या अल्पदरातील भोजनाच्या उपक्रमाला शेतक-यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
 त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या शेतक-यांसाठी लातूर कृषि उत्पन्न बाजार समिती ही अन्नपूर्णा ठरत आहे. या अल्पदरातील पोटभर जवनाचा आस्वाद आजपर्यंत ८६ हजार ६२१ शेतक-यांनी घेतला आहे. यात २०१८-१९ मध्ये ३३ हजार ५८१ शेतक-यांनी जेवनाचा आस्वाद घेतला. २०१९-२० मध्ये २८ हजार ५५५ शेतकरी, २०२०-२१ मध्ये ५ हजार ६८ शेतकरी, २०२१-२२ मध्ये ३ हजार ८८२ शेतक-यांनी, २०२२-२३ मध्ये २ हजार ५४९ शेतक-यांनी, २०२३-२४ मध्ये दि. २८ फेबु्रवारी पर्यंत ९ हजार ८६० शेतक-यांनी, तर १ मार्च ते ३० एप्रिल पर्यत २ हजार ३०० शेतक-यांनी रूचकर जेवनाचा आस्वाद घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR