23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयसहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला

सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांचा दावा भाजपाचा पराभव निश्चित

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान झाले असून आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी आहे. यातच आता सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला असून, आता भाजपाचा पराभव होऊन सत्तेतून जाणे निश्चित आहे असा मोठा दावा करण्यात आला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट करत सदर दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा झाला. आतापर्यंत ४८६ जागांवर मतदान झाले आहे. आता, पंतप्रधानांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या योजनांवर विचार सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी परिस्थिती अगदी स्पष्ट आहे. भाजपाचे जाणे निश्चित झाले असून दक्षिणेत त्यांचा सुफडा साफ होत आहे. उत्तर, पश्चिम आणि पूर्वेतून ते निम्मे होत आहेत, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे.

‘इंडिया’ला ३५० पेक्षा अधिक जागा मिळणार
पहिल्या टप्प्यापासून इंडिया आघाडीला मिळणारा जनाधार सतत बळकट होत आहे. महाराष्ट्र, यूपी, बिहार आणि दिल्लीत मतदान झाल्यानंतर आघाडीच्या घटक पक्षातील अविश्वसनीय केमिस्ट्री आपण पाहत आहोत. इंडिया आघाडीने आधीच २७२ जागांचा टप्पा ओलांडला आहे आणि एकूण ३५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. मावळत्या पंतप्रधानांचा विश्वासघात आणि हेराफेरी देशातील मतदारांना समजली आहे. भाजपाचे विजयी अभियान लवकरच संपुष्टात येत असल्याने पंतप्रधानांकडे निवृत्तीच्या योजना तयार करण्यासाठी अतिरिक्त वेळ आहे.

मतदार धडा शिकवणार
पंतप्रधानांना पराभव अगदी जवळ दिसतो तेव्हा ते आणखी भ्रामक गोष्टी बोलतात. आता म्हणतात आहे की, त्यांना देवाने पाठवले आहे. कदाचित ते त्याच्या पुढच्या कारकिर्दीत स्वत:ला गॉडमॅन म्हणून पाहतात. त्यांच्या अनुयायांनीही त्यांचा मुद्दा मान्य केला आहे. पुरी येथील भाजपाचे उमेदवार संबित पात्रा म्हणाले की, भगवान जगन्नाथ हे पंतप्रधानांचे भक्त आहेत. भारतातील मतदार या दोघांना धडा शिकवणार आहेत. ही निवडणूक काँग्रेस पक्षाच्या सकारात्मक प्रचाराभोवती केंद्रित झाली.

निवडणूक आयोग झोपेतच
निवडणूक आयोग झोपेतच आहे, हे दुर्दैव आहे. मावळत्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपा दररोज आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत आहे. मतदानात धार्मिक चिन्हांचा वापर, मतदानाच्या दिवशी जाहिराती, भाजप कार्यकर्त्यांचे मतदानाचे व्हीडीओ सोशल मीडियावर वारंवार पोस्ट करणे या सर्वांनी निवडणूक आयोगाच्या मावळत्या पंतप्रधानांना जबाबदार धरण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR