24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरसहा महिने कैद, ७ लाखांची भरपाई देण्याचे आदेश

सहा महिने कैद, ७ लाखांची भरपाई देण्याचे आदेश

अहमदपूर : प्रतिनिधी
धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस सहा महिने कैद, सात लाख तीस हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश अहमदपूर येथील तालुका न्यायालयाने दिली आहे.ऊसतोड मजूर पुरविण्यासाठीच्या व्यवहारात अनियमीततेच्या कारणावरुन आरोपीस कैद नुकसानभरपाईची रक्कम देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
अहमदपूर तालुक्यातील धानोरा खुर्द येथील प्रभाकर नागोराव नाकसाखरे यांच्याकडून आरोपी बापूराव बळीराम राठोड रा. मरशिवणी तांडा याने मी मुकादम असून जक्राया साखर कारखाना येनकी (ता.मोहोळ जि.सोलापूर) येथे ऊसतोड मजूर पुरविण्याचे काम करतो असे सांगून फिर्यादीच्या ट्रॅक्टरमार्फत ऊस वाहतूक करण्यासाठी ऊसतोड मजूर पुरवठा करण्यासाठी मान्य केले तसेच या कामी त्याने काही अनामत रक्कम देण्यासही सांगितले.
त्यानुसार फिर्यादीने आरोपीस रुपये सात लाख तीस हजार करार करून साक्षीदारांसमक्ष दिले. आरोपीने ठरलेल्या करारानुसार ऊसतोड मजूर पुरवठा तर केला नाहीच उलट फिर्यादीस त्याने बँक ऑफ इंडिया शाखा अहमदपूर येथील रक्कम रुपये सात लाख तीस हजार रुपयाचा धनादेश सही करून दिला. फिर्यादीने सदरील धनादेश  उस्मानाबाद जनता सहकारी बँक शाखा अहमदपूर येथे वटण्यासाठी लावला असता खात्यामध्ये अपुरी रक्कम या कारणास्तव सदरील धनादेश
बँकेने धनादेश वापस मेमोसह परत दिला.
या प्रकरणी अ‍ॅड.अनिलराव नवटक्के यांच्या मार्फत फिर्यादीने आरोपीस सदरील धनादेशाची रक्कम परत करण्याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली असता आरोपीने सदर रक्कम मुदतीमध्ये परत केली नाही. त्यानंतर फिर्यादीने आरोपी विरुध्द अहमदपूर येथील फौजदारी न्यायालयात फिर्याद दाखल करून आरोपी विरुद्ध प्रकरण चालविण्यात आले.
या प्रकरणात दोन्ही बाजूचा साक्षी-पुरावा, युक्तीवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.जी.साबळे यांनी आरोपी बापूराव बळीराम राठोड यास १० मे २०२४ रोजी सहा महिने साधी कैद तसेच नुकसान भरपाई म्हणून सात लाख तीस हजार रुपये एक महिन्याच्या आत फिर्यादीस देणेबाबत आदेश केला. सदरील रक्कम एक महिन्याच्या आत द्यावी त्यात कसूर केल्यास दोन महिने साधी कैद भोगण्याची शिक्षा दिली. फिर्यादीकडून अ‍ॅड.अनिलराव नवटक्के यांनी काम पाहिले व त्यांना अ‍ॅड. नागेश हिप्परगेकर यांनी सहाय्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR