परभणी : सांगली अर्बन को ऑपरेटीव्ह बँके लि. सांगलीच्या ९०व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि.४ फेब्रुवारी रोजी परभणी शहरातील गांधी पार्क येथील बँकेच्या शाखेत रक्तदान शिबिराचे तसेच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित रक्तदान शिबिरात बँकेच्या कर्मचारी तसेच ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त परभणी शाखेत महिलांसाठी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बँकेच्या महिला खातेदारांसह बॅक खातेदारांच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हळदी कुंकू कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
यावेळी बँकेचे शाखा सल्लागार राजेश देशपांडे, सूरेंद्र शहाणे, श्रीमती हरदास, मधुकर गव्हाणे, विभागीय अधिकारी विश्राम भरणे, शाखाधिकारी विष्णू प्रसाद सोनी, राहुल पत्तेवार, अबोली जोशी, श्रुती वैद्य, संतोष कुलकर्णी, कृष्णा कुलकर्णी, नंदकुमार कुलथे, योगेश अनासपुरे सर्व कर्मचारी व सभासद उपस्थित होते.