पुणे : पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. २९ मे रोजी रात्री पोलिस ठाण्याच्या जवळच गोळीबार झाल्याची घटना घडली. टू व्हिलरवरून दोघांनी येऊन एका तरुणावर थेट गोळीबार केला आणि या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
योगेश जगतापविरुद्ध गणेश ढमाले यांच्या वर्चस्वाच्या लढाईत हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. दीपक कदम असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या वर्चस्वाच्या लढाईत आजपर्यंत तिघांचा बळी गेला.