28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeपरभणीसातेगाव शाळेत शाळा पूर्व मेळावा संपन्न

सातेगाव शाळेत शाळा पूर्व मेळावा संपन्न

पूर्णा : तालुक्यातील सातेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा कार्यक्रम दि.१९जून रोजी घेण्यात आला. याप्रसंगी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रवेश पात्र विद्यार्थ्याचे नाव नोंदणी, शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे का नाही हे तपासणे, उंची मोजणे, मराठी भाषा विषयी आवड निर्माण करणे तसेच साहित्यांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक २ मध्ये एकूण ७ टेबल ठेवून कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवसेना सर्कल प्रमुख रमेशराव ठाकूर, युवा कार्यकर्ते नागोरावजी शिवनखेडे, पोलीस पाटील लताबाई ढगे राहुल ढगे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माणिकराव ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष नारायणराव ठाकूर, मुख्याध्यापक मनोज राठोड व महिला अंगणवाडी सेविका रेणुकाताई डांगे, शांताबाई ढगे, रोहिणी शिवनखेडे, राणीताई शिवनखेडे, मनीषाताई ढगे उपस्थित होते. आभार सहशिक्षक नागेश अडबलवार यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR