35.5 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रसाहेब, ५ वर्षे कुठे होतात?

साहेब, ५ वर्षे कुठे होतात?

शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात बॅनर

शिरूर : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघात बॅनर झळकले आहेत. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. शिरूरमध्ये लागलेल्या या बोलक्या बॅनरची आता सर्वत्र चर्चा आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीत पुन्हा आमनेसामने आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे. परंतु मागच्या पाच वर्षांत अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, अन् आता प्रचारासाठी मतदारसंघात येत आहेत, अशी नाराजी काही सुज्ञ नागरिकांनी बोलून दाखवली आहे.

शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे यांनी दौरा केला. यावेळी परिसरात अमोल कोल्हे यांच्या विरोधात बोलके पोस्टर लागलेले पाहायला मिळाले. त्यात विद्यमान खासदार साहेब पाच वर्षे तुम्ही कुठे होता? कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघामध्ये का नव्हता? पाच वर्षे मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा मिळाला? असे तीन प्रश्न बॅनरद्वारे विचारण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR