33.5 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeलातूरसिकंदरपूरच्या सन्मानात आणखी एक मानाचा तुरा

सिकंदरपूरच्या सन्मानात आणखी एक मानाचा तुरा

लातूर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर-महाराष्ट्र शासन ग्रामविकास, पंचायतराज व विभागीय आयुक्त कार्यालय संभाजी नगर यांच्या वतीने मराठवाड्यातील आठ ही जिल्ह्यातील प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या गावाची तपासणी करून संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०२२-२३ होऊन त्याचा निकाल लागला. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता विशेष पुरस्कार ७५ हजार रुपयाचे पारितोषक प्रमाणपत्र विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते आर. आर. आबा स्मार्ट ग्राम व्हिलेज सिकंदरपूर ता. लातूरच्या उपक्रमशील सरपंच रेशमा माधवराव गंभीरे ग्रामपंचायत अधिकारी कलबूने के. बी. यशदा प्रवीण प्रशिक्षक माधव गंभीरे ग्रामपंचायत कर्मचारी गहिनीनाथ बोयने यांनी स्वीकारले
सदरील पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त कार्यालय सभागृह संभाजी नगर येथे झाले. या वेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता, अप्पर आयुक्त के. आर. परदेशी, उपायुक्त सुरेश बेदमूथा, उपायुक्त साधना जगताप उपस्थित होत्या. ग्राम संसद, अंगणवाडी, शामशानभूमी आय. एस. ओ. करून २०२२-२३ मध्ये ग्राम संसद सिकंदरपूरने वेळोवेळी प्रयोग शाळेच्या पाणी तपासणीत चंदेरी कार्ड व ग्रीन कार्ड मिळवले आहेत. गावचा शाश्वत विकास करत ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे, सार्वजनिक ठिकाणी हात धुण्यासाठी हॅन्ड स्टेशन उपलब्ध करून दिले, घण कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक साठवण्यासाठी शेगारिकेशन शेड उभारणे, घंटागाडीच्या माध्यमातून कच-याचे संकलन व ओला व सुखा कचरा वर्गीकरण करणे, नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी अबेटिंग व धुर फवारणी, बालकांचे लसीकरण, गटारांची नित्यनियमाने साफसफाई, मुख्य चौक व गावच्या परिसराची दैनंदिन झडवाई आदी कामे केल्या बद्दल या पूर्वी गावास आर. आर. आबा स्मार्ट ग्राम पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR