18.2 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeलातूरसिटी प्रेस क्लबच्या वतीने आज होणार पत्रकारिता पुरस्काराचे वितरण

सिटी प्रेस क्लबच्या वतीने आज होणार पत्रकारिता पुरस्काराचे वितरण

चाकूर : प्रतिनिधी
सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्काराचे वितरण राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते रविवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकायत शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड. पी. डी. कदम हे राहाणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माहिती विभागाचे विभागीय सहाय्यक संचालक डॉ. शाम टरके, प्रमुख पाहूणे म्हणुन सहाय्यक पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, तहसीलदार नरसींग जाधव, गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे हे मान्यंवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने या वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या पत्रकारांना पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी स्व.नागोराव संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ पत्रकार अ. ना.शिंदे यांच्यावतीने ‘मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ दैनिक एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर यांना दिला जाणार आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी कालवश मालनबाई सोपानराव कांबळे व कालवश सोपान काशीराम कांबळे यांच्या स्मरणार्थ पत्रकार मधुकर कांबळे यांच्या वतीने ‘मायदादा वृत्तरत्न पुरस्कार’ टाईम्स नाऊ मराठीचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत घोणसे पाटील व स्व.काशीबाई बळीराम सोनटक्के यांच्या स्मरणार्थ जेष्ठ स्वातंत्र सैनिक बळीरामजी सोनटक्के व पत्रकार संगमेश्वर जनगावे यांच्या वतीने ‘पत्रकार भूषण पुरस्कार’ दैनिक मराठवाडा केसरी सह अनेक दैनिकांचे समूह संपादक नरसिंह घोणे यांना देण्यात येणार आहे.

तसेच तालुकास्तरीय पुरस्कारासाठी स्व.पत्रकार प्रा.सी.बी.सय्यद यांच्या स्मरणार्थ पत्रकार सलीम तांबोळी यांच्यावतीने ‘चाकूर भूषण पत्रकारिता पुरस्कार’ दैनिक गावकरीचे जिल्हा प्रतिनिधी संजीव पाटील यांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यांत येणार आहे. अशी माहिती सिटी प्रेस क्लब चाकूरचे अध्यक्ष प्रा.अ. ना. शिंदे व सचिव मधुकर कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR