27.1 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeअंतरराष्ट्रीयसीरियात रशियन सैन्याची पिछेहाट; पुतीनसाठी नामुष्की

सीरियात रशियन सैन्याची पिछेहाट; पुतीनसाठी नामुष्की

होम्स : वृत्तसंस्था
सीरियामध्ये फक्त असद सरकारलाच धोका नाही, तर रशियन सैन्याच वर्चस्वही धोक्यात आहे. हमा शहर ताब्यात घेतल्यानंतर हयातचे योद्धे रशियाचा गड असलेल्या होम्स शहराच्या बॉर्डरवर पोहोचले आहेत. अलेप्पो आणि हमामध्ये जे झालं, पुढच्या काही तासात होम्सची सुद्धा तशीच स्थिती होण्याची भिती आहे. हयात तहरीर अल शामचे फायटर पुढच्या काही तासात त्या शहरांचा ताबा घेतील. रशियन सैन्याचे तीन एअर बेस आणि नेवल बेस होम्समध्ये आहे. असद आणि पुतिन यांच्या हातातून हा देश जाण्याची शक्यता आहे.

सीरियन सैन्य युद्ध क्षेत्र सोडून दमिश्कच्या दिशेने जात आहे. असद सरकारचं सैन्य मागे हटत असल्याने बंडखोर, सैन्य तळांवर ताबा मिळवत आहेत. बंडखोरांनी हल्ले करुन सीरियाई हवाई दलाची अनेक मिग-२३ फायटर विमान ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सीरियन सैन्याची उपकरणे मिळवली आहेत. हयात तहरीर अल शामच्या फायटर्सनी अलेप्पोच्या नेयराब एअरबेसवरुन अनेक मिग-२३ फायटर विमाने जप्त केली आहेत.

हयात तहरीर अल शाम गटावर संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांनी बंदी घातली आहे. मात्र, असे असूनही या गटाला अमेरिका आणि टर्कीकडून समर्थन मिळत आहे. हयात तहरीर अल शाम सोबत लढणा-या गटांची विचारधारा वेगवेगळी आहे. पण असद यांना सत्तेवरुन हटवण्याच्या या एकाच उद्देशाने हे सर्व गट एकत्र आले आहेत. २७ नोव्हेंबरपासून बंडखोरांनी असद सरकार विरोधात लढाई सुरु केली आहे. त्यांनी आतापर्यंत अलेप्पो, हामा आणि दर्रा ही शहरं ताब्यात घेतली आहेत. अल-कायदाशी संबंधित हयात तहरीर अल शामचे फायटर्स अन्य छोट्या-छोट्या कट्टरपंथीय गटांसोबत मिळून असद सरकार विरोधात लढत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR