सुवर्ण पंचने आशियाई क्रीडा स्पर्धेची सांगता

२१ सुवर्णसह ८५ पदकांची कमाई, भारत चौथ्या स्थानी
आयची-नागोया : वृत्तसंस्था
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अखेरच्या दिवशीही उत्तम कामगिरी केली असून, पाच सुवर्णसह एकूण ९ पदकांची कमाई केली. यामध्ये २ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेची सांगता आज झाली असून, भारताने एकूण ८५ पदके पटकावली. यात २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने मागच्या वेळी पदकांचे शतक पार केले होते. मात्र, यावेळी भारताला ८५ पदकांवरच समाधान मानावे लागले. परंतु अखेरच्या टप्प्यात भारतीय क्रीडापटूंनी अतिशय उत्तम कामगिरी केल्याने भारताने टॉप ४ मध्ये स्थान मिळविले असून, आशियाई स्पर्धेत भारताचा दबदबा पाहायला मिळाला.

भारताने अखेरच्या दिवशी क्रिकेट, हॉकी, कुस्तीसह तिरंदाजी आणि गोल्फ अशा पाच स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले. सकाळच्या टप्प्यात मराठमोळ््या कुमकुम मोहाडने तिरंदाजी स्पर्धेत व्यक्तिगत गोल्ड मेडल पटकावले. या अगोदर तिने सांघिक स्पर्धेतही गोल्ड मेडल मिळविले होते. त्यामुळे मोहाडची कामगिरी शानदार ठरली. त्याचवेळी नीरज चौहान याने पुरुष व्यक्तिगत रिकर्व्ह तिरंदाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. दुसरीकडे गोल्फ स्पर्धेत भारताच्या प्रणवी उर्सने ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. यासोबतच तिने अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांच्यासोबत महिला टीममधून रौप्य पदकावरही मोहोर उमटविली.

यानंतर क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानला लोळवत सुवर्ण पदक जिंकले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानसोबत झालेल्या लढतीत १९ धावांनी मात केली आणि सुवर्ण पदकावर कब्जा मिळविला. भारताने बोर्डावर ६ बाद २११ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर पाकला फारसा टिकाव धरता आला नाही. त्यामुळे पराभव पत्करावा लागला. या अगोदर भारतीय महिला क्रिकेटपटूंनही सुवर्ण पदक जिंकले होते.

याशिवाय भारताचा २३ वर्षीय कुस्तीपटू अमन सेहरावतने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी २० वे सुवर्णपदक पटकावले. पॅरिस ऑलिम्पिकच्या कांस्य पदक विजेत्या अमनने पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या अंतिम लढतीत उत्तर कोरियाच्या चोंग सोंग हानचा पराभव करीत पदकतालिकेत आणखी एका सुवर्ण पदकाची भर टाकली. अखेरच्या दिवशी एकूण ९ पदकांची कमाई केल्याने भारताने एकूण ८५ पदकांसह या स्पर्धेत टॉप चारमध्ये येण्याचा मान मिळविला.

४९५ क्रीडापटूंनी
नोंदवला सहभाग
आशियाई क्रीडा स्पर्धेत ४९५ क्रीडापटूंनी सहभाग नोंदवला होता. १४ दिवस चाललेल्या या स्पर्धेत ३६ क्रीडा प्रकारांत भारतीय क्रीडापटूंनी ८५ पदकांची कमाई केली. यामध्ये २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांचा समावेश आहे. मागच्या वेळी झालेल्या हांगझोऊ येथील सामन्यांच्या तुलनेत भारताची पदक संख्या कमी आहे. परंतु कामगिरी उंचावली आहे. त्यामुळेच भारत चौथ्या स्थानी पोहोचू शकला.

आशियाई क्रीडा स्पर्धेत
भारत चौथ्या स्थानी
देश पदकसंख्या
चीन : २८८
जपान : २१७
द. कोरिया : ११३
भारत : ८५
उजबेकिस्तान : ५६

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31

Latest news