28.5 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeमनोरंजनसोनू सूदविरोधात अटक वॉरंट जारी

सोनू सूदविरोधात अटक वॉरंट जारी

मुंबई पोलिसांना कोर्टाचा आदेश

मुंबई : नेहमी इतरांना मदत करणारा अभिनेता सोनू सूद आता स्वत:च कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. लुधियाना कोर्टाकडून त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. न्यायमूर्ती रमणप्रीत कौरने हा वॉरंट जाही केला आहे. सोनू सूदला एका प्रकरणात कोर्टात साक्ष देण्यासाठी अनेकदा समन्स पाठवण्यात आले. मात्र तो एकदाही आला नाही. त्यामुळे आता त्याच्याविरोधात थेट अटक वॉरंटच निघाले आहे.

लुधियानाचे वकील राजेश खन्नाने मोहित शुक्ला या व्यक्तीविरोधात १० लाखांची फसवणुकीची केस दाखल केली. शुक्लाने त्यांना गुंतवणुकीचे आमिष दाखवत त्याची फसवणूक केली होती. याचप्रकरणात सोनू सूदलाही साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र अनेकदा समन्स मिळूनही तो कोर्टात हजर झाला नाही. आता त्याला थेट अटक करण्याचा कोर्टाचा आदेश आहे. हे वॉरंट मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. यामध्ये अभिनेत्याला अटक करणे आणि त्याला कोर्टात घेऊन येण्याचे आदेश दिले आहेत.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारीला होणार आहे. अद्याप अभिनेत्याने यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. सोनू सूदचा नुकताच फतेह सिनेमा रिलीज झाला. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोनूने स्वत:च या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR