27.2 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeसोने १,१०,००० रूपयांचा पल्ला गाठणार!

सोने १,१०,००० रूपयांचा पल्ला गाठणार!

फेडरल बॅँकेच्या व्याजदर कपातीचा परिणाम

मुंबई : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदर कपातीमुळे सोन्याचे दर वाढले आहेत असे मानले जात आहे. आगामी काळात व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे.
कोटक सिक्योरिटीजशी संबंधित अनिंदय बॅनर्जी यांच्या मते सोन्याचा दर पुढील ४ वर्षांत ४,००० डॉलर प्रति औसपर्यंत पोहोचू शकतो. अर्थात देशांतर्गत बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर १,१०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
याशिवाय, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील वाढलेल्या तणावाचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर, जगभरातील केंद्रीय बँकांकडून सातत्याने सोन्याची खरेदी केली जात आहे. हे देखील सोन्याच्या दरातील तेजीमागचे एक मोठे कारण आहे.
फेडरल रिझर्व्हने या महिनाभरात व्याजदरात ५० बेसिस पॉइंटने कपात केली आहे. फेडरल रिझर्व्हने गेल्या ४ वर्षांत प्रथमच व्याजदरात कपात केली. या कपातीनंतर व्याजदर ४.७५ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान आला आहे. डॉलर कमजोर झाल्याचा फायदा सोन्याला होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा जेव्हा डॉलर कमजोर होईल तेव्हा सोन्याच्या किमतीत वाढ नक्कीच दिसून येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR