सोन्याचे दागिने चोरणा-या ३ आरोपींना अटक

लातूर : प्रतिनिधी
काही दिवसा पूर्वी पोलीस ठाणे रेणापूर हद्दीमध्ये लातूर ते रेणापूर रोड जाणारे रोड वरील बोरवटी गावा जवळ अज्ञात आरोपींनी कार मधून जाणारे दांपत्याना अडवून त्यांना धमकी व धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यावरून पोलीस ठाणे रेणापूर येथे २ गुन्हे दाखल झाले होते.
सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथका कडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी परिश्रम घेण्यात येत होते.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून मोटरसायकल वर येऊन कार चालकांना अडवून त्यांना धमकी, धाक दाखवून, जबरीने सोन्या-चांदीचे दागिने लुटणा-या आरोपींची माहिती मिळाली. सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून मोटरसायकल वर येऊन सदरचे गुन्हे करणा-या आरोपीना निष्पन्न करून, सदर आरोपींना त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन नमूद आरोपीला गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे ९.४ तोळे वजनाचे ६ लाख ७६ हजार रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. अमोल सुभाष राठोड, वय २७ वर्ष, राहणार नेहरूनगर तांडा ता. रेणापूर, अभय उर्फ राहुल संतोष चव्हाण, वय २१ वर्ष, राहणार नेहरूनगर तांडा तालुका रेणापूर, कृष्णा राजूभाऊ ढमाले, वय २५ वर्ष, राहणार बोरवटी ता. जि. लातूर  यांना ताब्यात घेवुन मुद्देमाल जप्त करून नमूद गुन्ह्यात अटक करणे कामी पोलीस ठाणे रेणापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news