जालना : प्रतिनिधी
सोने-चांदीतील गुंतवणूक, खरेदी कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केल्यावरही देशात सोन्याची खरेदी सुरूच होती. मात्र वाढती महागाई आणि गगनाला भिडलेले भाव यामुळे खरेदीचा उत्साह कमी झाला होता. मात्र आज २३ मे रोजी दरवाढीला ब्रेक लागला असून देशभरात आता सोन्याच्या दरातील वाढ थांबली आहे.
जळगाव येथील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १ ग्रॅम १,५९,६५० रुपयांपर्यंत घसरला आहे. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १,५९,४८० रुपयांपर्यंत खाली आला आहे. अमेरिका-इराण यांच्यातील सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू असलेल्या मध्य-पूर्वेतील संघर्षाच्या निकालावर आणि महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आता काही करार होईल की नाही, काही तोडगा निघतो की नाही यावर व्यापारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
















