मुंबई : दिवसेंदिवस बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोमवारी महाराष्ट्रात सोन्याच्या दरांनी १ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला.
दरम्यान, राज्याची आर्थिक राजधानी मुंबई येथे त्यामुळे आता १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव जीएसटी कराची रक्कम धरून १ लाखांच्या पुढे गेला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरात थोडीफार तफावत पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि चीन यांच्या सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी आपला मोर्चा सर्वात सुरक्षित पर्याय मानल्या जाणा-या सोन्याकडे वळवला आहे.
राज्यातील प्रमुख शहरामध्ये सोन्याचे भाव
मुंबई :
मुंबईत सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ११६ रुपयांवर पोहोचला
पुणे सोन्याचे दर
९९,१०० रुपय १० ग्रॅम जीएसटी धरून
कोल्हापूर सोने दर
९९,६०० सोने १० ग्रॅम ( एक तोळा )जीएसटी धरून
छत्रपती संभाजीनगर
९९ हजार ५०० जीएसटीसह सोने १० ग्रॅम-
सोलापूर
शहर जीएसटीविना
२२ कॅरेट सोने – ८९,९९०
धुळे सोन्याचे दर
२४कॅरेट सोने : ९६ हजार ७००
बुलडाणा जीएसटीसह
सोने – १००००० रू प्रति १० ग्रॅम
चांदी – ९९,९५० प्रति किलो
जळगाव सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी
सोने जीएसटीसह ९९,६०० प्रति तोळा
चांदी- ९९,४००
वाशिम येथील सराफा बाजारात आजचे सोन्याचे आणि चांदीचा जीएसटीसह भाव
२४कॅरेट सोने – ९६५०० प्रति १०ग्रॅम
चांदी -१ लाख रु प्रति किलो
परभणी आजचे सोन्याचे दर
जीएसटीसह ९९ हजार २०० रुपये प्रति तोळा
सांगलीत सोन्याचा आजचा दर (जीएसटी वगळून)
सोने दर- ९६५५०
चांदी दर- ९७१००
सिंधुदुर्ग
सोने दर : १,००,०००
चादी दर : १,००,०००
जालना (जीएसटीसह)
सोने- ९९२००
चांदी- ९९३००