22.5 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeराष्ट्रीयसोन्याला झळाळी; शेअर बाजारात उलथापालथ

सोन्याला झळाळी; शेअर बाजारात उलथापालथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होण्यास अवघे २ दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. यावेळी सोनेही शांत राहिलेले नाही. मागणीत जोरदार वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे सोन्याने ८३,७५० रुपये प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. गेल्या ट्रेडिंग सत्रात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ८२,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने ही माहिती दिली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच इतर देशांवर आयात शुल्क लादण्याचा इशारा दिला. यानंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. बाजारातील भागधारक यूएस फेडरल रिझर्व्ह (फेड) च्या व्याजदर धोरणावरील निर्णयाची वाट पाहत आहेत.

मोदी सरकारने जुलै २०२४ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील शुल्कात कपात केली होती. त्यानंतर मौल्यवान धातूच्या दरात मोठी कपात झाली होती. सर्वसामान्यांनी या निर्णयाचे कौतुक केलं होतं. आता सोने ८३ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR