22.9 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeलातूरसोयाबीन चार हजारांवर स्थिरावले 

सोयाबीन चार हजारांवर स्थिरावले 

लातूर : प्रतिनिधी
नवे सोयाबीन बाजारपेठेत दाखल होताच सोयाबीनच्या दरात चढ-उत्तार सुुरु झाला होता. ४ हजार ५०० रुपयांवरील सोयाबीन थेट ३ हजार ८०० रुपयांपर्यंत घसरले होते. त्यामुळे शेतक-यांनी विक्रीबाबत सावध पवित्रा घेतला असताना आता सोयाबीनचे दर ४ हजारांवर स्थिरावले आहेत.
यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असली तरी शेतक-यांचे अर्थकारण हे याच पिकावर अवलंबुन आहे. उत्पादन घटल्याने दरात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ४ हजार ५०० रुपयांवरील सोयाबीन हे ३ हजार ८०० रुपये क्विंटलवर आल्याने शेतक-यांनी विक्रीपेक्षा साठवणुकीवर भर दिला होता. त्यामुळे ६० हजार क्विंटलवरील आवक थेट ३० हजारावर येऊन ठेवली आहे. मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २९ हजार क्विंटलची आवक झाली. तर दर ४ हजार १०० रुपये मिळाला होता. भविष्यात सोयाबीनचे दर स्थिर रहावेत, अशअी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरातील चढ-उतारामुळे श्तोकरी चिंताग्रस्त होते. किमान ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर टिकून रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR